Health Connect by Android हे तुम्हाला गोपनीयतेमध्ये तडजोड न करता आरोग्य, स्वास्थ्य आणि संतुलन या अॅप्सदरम्यान तुमचा डेटा शेअर करण्याचा सोपा मार्ग देते.
Health Connect हे बीटामध्ये आहे. आम्ही तुमच्यासोबत उत्पादन शेअर करण्यासाठी उत्सुक आहोत आणि भागीदार अॅप्स आणि नवीन सुधारणा जोडणे पुढे सुरू ठेवण्याकरिता कठोर परिश्रम घेत आहोत.
एकदा Health Connect डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही ते तुमच्या सेटिंग्जमधून सेटिंग्ज > अॅप्स > Health Connect किंवा तुमच्या क्विक सेटिंग्ज मेनूवर जाऊन अॅक्सेस करू शकता.
तुम्ही अॅक्टिव्हिटी किंवा झोप, पोषण अथवा परिमाणे यांच्यावर लक्ष केंद्रित करत असलात, तर तुमच्या अॅप्सदरम्यान डेटा शेअर केल्याने, तुम्हाला तुमचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होऊ शकते. Health Connect हे तुम्हाला सोपी नियंत्रणे देऊ करते, जेणेकरून तुम्ही फक्त तुम्हाला हवा तो डेटा शेअर करू शकाल.
Health Connect हे तुमच्या अॅपमधील आरोग्य आणि फिटनेसशी संबंधित डेटा एकाच ठिकाणी, ऑफलाइन व तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर करते, जेणेकरून तुम्ही तुमच्या विविध अॅप्समधून डेटा सहजरीत्या व्यवस्थापित करू शकाल.
नवीन अॅपला तुमचा डेटा अॅक्सेस करता येण्यापूर्वी, तुम्हाला काय शेअर करायचे आहे ते तुम्ही पुनरावलोकन करून निवडू शकता. तुम्ही तुमचा विचार बदलल्यास किंवा तुमचा डेटा कोणत्या अॅप्सनी अलीकडे अॅक्सेस केला होता ते पाहायचे असल्यास, हे सर्व Health Connect मध्ये जाणून घ्या.